मातृत्व
मातृत्वाचे दान घेउनी, जिवती आली तुझ्या दारी |
घे जननी ते तुझ्या पदरी , आनंद फुलू दे तुज संसारी ||
श्रेष्ठ दान हे निसर्गाचे , असे स्त्रीला मातृत्वाचे,
सार्थवचन हे सप्तपदीचे , स्त्रीजन्माच्या पूर्णत्वाचे |
पावन निर्मल ठेवअसे ही, शिव अन शक्तीच्या मिलनाची,
परंपरा ही निर्वाहाची , "अभय" अश्या सृष्टी-सृजनाची |
No comments:
Post a Comment