सूर्योदय
शहरापासून दूर एखाद्या छोट्या खेड्यात किंवा खेड्या सदृश्य एखाद्या जागेवर जेंव्हा आपण रात्री च्या वसतीला असतो,तेंव्हा भल्या पहाटे उठून वर आकाशातील चांदणे निरखताना सहजच विचार येतो कि ह्या आकाश सौंदर्याला नक्की उपमा कसली द्यावी.कवी मनाला ह्या सौंदर्याची भूलच पडते आणि त्याला आकशातील तारका ह्या नभ मंडपिचे दीप,किंवा चंद्रकळेच्या पदर वरची भरजरी खडी ,वा एखाद्या आस्मानी परीचा शृंगार वाटतो.
पक्ष्यांची किलबिलीत एखाद्या गायकाच्या सकाळच्या स्वरसाधनेचा भास होतो.असेच काहीसे माझ्या बरोबर घडले आणि मी तो अनुभव कविता पंक्तीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे,तो असा,
भल्या पाहते उठुनी पाहता, तारांगण ते उज्ज्वल सारे,
नील-नभीचे दीप भासती, लुकलुकणारे शुभ्र तारे ||
अंधाराच्या श्याम पदरी, तारकांची खाडी भरजरी,
चंद्रकळा जणू उभी नेसुनी, निलगृही ती निशासुंदरी ||
का? तारकांचे साज लेवुनी, कुणी परी ती आस्मानी,
रात्र प्रवासी "रवी" स्वागता, उभी ठाकली सज्ज होऊनी ||
भल्या पहाटे कोंबड्याने, आरवातून साद घातली,
जणू म्हणाला उठ माणसा, रात सरली पहाट झाली ||
स्वर साधना पक्ष्यांची ती, वन राईतून कानी येते,
जाग येते चराचराला, तेंव्हा आपल्या ध्यानी येते ||
अंधाराला दूर सारुनी, प्राचीच्या त्या क्षितीज पटली,
साक्ष देण्या "रवी" उदयाची, रंग छटाची नक्षी दाटली ||
प्राचीला उदयास येउनी , मावळतीला अस्त पावतो,
रात्रंदिन तो "रवी" प्रवासी, पूर्व पश्चीम अथक धावतो ||
|

No comments:
Post a Comment