| सूर्य महिमा |
तपन जसा तो तप्त होऊनी ,इतरांना जो प्रकाश देतो ,
दग्ध होऊनी स्वःतेजाग्नी ,तेजोमय अवकाश देतो |
चंद्राचे लावण्य स्तुत्य ते, सुर्याप्रकाशी नभी झळकते ,
लोप पावता रवी तेज ते , अवस तमी कसे मावळते |
मनो -निग्रही तेज् बलाने, ज्ञानाचे ते कोश भरावे ,
विनम्रतेच्या नम्र ओंजळी, तेजाचे त्या अर्घ अर्पावे |
दाहकता सूर्याची सांगे, कुणी स्वार्थ जवळ न यावा ,
दान करिता त्या तेजाचे , गर्वाचा ही स्पर्श न व्हावा |
निष्काम कर्म हे ,ह्यास म्हणावे ,अन वंदावे ह्या कार्याला ,
निष्काम-योगी जो दातृत्वाचा , "अभय" नमावे त्या सूर्याला ||