आपण फार पूर्वीपासून अनाथाश्रम हा शब्द ऐकत आलो आहोत. अनाथ मुलांना राहण्यासाठीचे स्थान म्हणजे अनाथाश्रम. तसेच आता समाजात चांगलाच रुजलेला व बराच जोम धरत चाललेला शब्द आहें - वृद्धाश्रम - अनाथ वृद्ध जोडप्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे वृद्धाश्रम| अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात एक मुलभूत फ़रक़ आहे. अनाथाश्रमतील मुले, त्यांच्या आई-बापाचा पत्ता नसल्यामुळे अनाथ असतात, पण वृद्धाश्रमातील वयोवृद्ध जोडप्यांची होण्याची स्थिती ही त्यांच्या मुलाबाळांनी, त्याच्या बद्दलची स्वतःची जवाबदारी नाकारल्यामुळे उद्भवते. ही वयोवृद्ध जोडपी उतारवयात मुलांना नकोशी झाल्यामुळे,सनाथ असून ही अनाथ ठरतात. अर्थात आईबापाना नाकारण्याची अनेक कारणे देता येतील व त्या कारणांचे समर्थन करणारे ही अनेक भेटतील. परंतु भारता सारख्या भावनिक नाती व परंपरा जपणाऱ्याआपल्या देशात,वृद्धाश्रम व्यवस्था क्लेशकारक,असमर्थनीय आणि अशोभनीय ठरते. असे असून ही काही प्रमाणात वृद्धाश्रम व्यवस्था ही अपरिहार्य ठरते.
वृद्धापकाळात फ़क़्त दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करून भागत नाही, तर वयापरत्वे, शारीरिक दौर्बाल्यातून उत्पन्न अनेक व्याधी, मानसिक ताण-तणाव, एकलेपण, नात्यांमधील कुरबुरी, दोन पिढ्यातील वैचारिक मतभेद, परदेशस्थ मुले, कुटुंबासाठी अपुरी पडणारी राहती जागा व त्या मुले नवीन जोडप्यांची एकांत न मिळण्याच्या तक्रारी, अशा अनेक बाजूंचा विचार व व्यवस्था करावी लागते. मुळात आजची वृद्धाश्रम व्यवस्था ही पाशिमात्य देशातून आयात केलेल्या अनेक सुखवस्तू व्यवस्थापैकी एक आहे.पाश्चीमात्य देशात मुले १८ वर्षांची झाली कि ते आई-बापांच घर सोडून स्वताचा संसार थाटतात, त्यात घरातील जेष्ठ व वृध्द व्यक्तीना स्थान नसते. अशा व्यक्तींना स्वताची व्यवस्था स्वताच करावी लागते. किंवा तिकडे सरकार कडून अशा दुर्लक्षित वृध्द व्यक्तींसाठी चालवल्या जाणाऱ्या ऑर्फनेज,विडोहोमस. किंवा शेल्तेर्स मध्ये ह्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येते. पण त्या देशात ही व्यवस्था समाज व सरकार मान्य असल्यामुळे गैर मानली जात नाही.
आपल्या देशात ही,२१व्या शतकात,एकत्रित कुटुंब पद्धतीचा ह्रास होऊन स्वतंत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब सुरु झाला. कुटुंब स्वातंत्र्य, व कुटुंबातील नव्या जोडप्यान्या एकांत न मिळण्याच्या तक्रारी सुरु झाल्या. व दिवसे दिवस वाढू लागल्या. मुलगा सून दोघे ही कुटुंब निर्वाहासाठीच्या आर्थिक जवाबदारीत भागीदार होऊ लागले. जी वृद्ध जोडपी सर्वस्वी मुलांवर आश्रित होती त्यांचा सांभाळ करण्यावरून मुलामध्ये खटके उडू लागले,मुले परदेशस्थ असल्यास, इकडे एकटे असलेल्या या वृध्द जोडप्यांची काळजी कोण घेणार?
मुले सोबत असून ही स्वताच्या कुटुंबाच्या निर्वाहाच्या जवाबदारी बरोबरच,वृध्द आई-बापांच्या आजारीपणात त्यांची सेवा सुश्रुषा, त्यांना आवश्यक वैद्यकीय सोई सुविधा, त्यांच्या शारीरिक, मानसिक गरजांकडे लक्ष्य पुरविणे, मुलांना जड जाऊ लागले. आणि ह्या सर्व परिस्थितून मार्ग काढण्यासाठी वृद्धाश्रमाची कल्पना आपल्या देशात जोर धरू लागली. आणि मागील काही वर्षात त्याची पाळे मुळे आपल्या समाजात चांगली रुजली. आज आपल्या देशात अनेक वृद्धश्रम कार्यरत आहेत व अनेक नवे नवे तीन तारांकित पंच तारांकित, सर्व सोयीनी युक्त असे वृद्धश्रम उदयास येत आहेत.ज्या निवृत्त जोडप्यांनी आपल्या वृद्धापकाळासाठी आवश्यक अशी आर्थिक तरतूद करून ठेवली आहे, त्यांना ह्या नवीन, सर्व सुख सोयीनी युक्त वृद्धाश्रमाचा आधार घेता येऊ शकतो.
मुले सोबत असून ही स्वताच्या कुटुंबाच्या निर्वाहाच्या जवाबदारी बरोबरच,वृध्द आई-बापांच्या आजारीपणात त्यांची सेवा सुश्रुषा, त्यांना आवश्यक वैद्यकीय सोई सुविधा, त्यांच्या शारीरिक, मानसिक गरजांकडे लक्ष्य पुरविणे, मुलांना जड जाऊ लागले. आणि ह्या सर्व परिस्थितून मार्ग काढण्यासाठी वृद्धाश्रमाची कल्पना आपल्या देशात जोर धरू लागली. आणि मागील काही वर्षात त्याची पाळे मुळे आपल्या समाजात चांगली रुजली. आज आपल्या देशात अनेक वृद्धश्रम कार्यरत आहेत व अनेक नवे नवे तीन तारांकित पंच तारांकित, सर्व सोयीनी युक्त असे वृद्धश्रम उदयास येत आहेत.ज्या निवृत्त जोडप्यांनी आपल्या वृद्धापकाळासाठी आवश्यक अशी आर्थिक तरतूद करून ठेवली आहे, त्यांना ह्या नवीन, सर्व सुख सोयीनी युक्त वृद्धाश्रमाचा आधार घेता येऊ शकतो.
आपल्या देशात ही आता वृद्धाश्रम व्यवस्थेला सामाजिक मान्यता मिळायला लागली आहे.आता गरज आहे ती वृद्धाश्रम व्यवस्थे कडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची. आता वृध्द आणि निवृत्त जोडप्यांनी ह्या व्यवस्थेकडे फक्त भावनिक दृष्टीने न बघता, व्यवहारिक दृष्टीने बघण्याची गरज आहे. वृद्धास्राम व्यवस्था ही फक्त कौटुंबिक तडजोड नसून ती आधुनिक काळाची समाजमान्य गरज आहे, हे सत्य स्वीकारण्याची, आणि ह्या व्यवस्थेला स्वेछेनी पाठींबा आणि आधार देण्याची.
जरी ही व्यवस्था आज आपणास पाश्चिमात्य देशाची भेट वाटत असली तरी,मुळात आपल्या सनातन समाज व्यवस्थेत त्याची बीजे रुजविली गेली होती.अर्थात कालौघात आपणास त्याचा विसर पडला हे अलहिदा. आपल्याकडे सनातन काळात प्रपंचाचे जे चार आश्रम सांगितले गेले अर्थात माणसाची आयुर्मर्यादा १०० वर्षे गृहीत धरून, प्रत्येक आश्रम २५वर्शच्य काल खंडात वाटला गेला होता.
- पहिली पंचवीस वर्षे-ब्र्म्हचार्याश्रम-मुलांवर संस्कार व शिक्षणाचा कालखंड.
- दुसरी पंचवीस वर्षे -गृहस्थाश्रम- प्रापंचिक जवाबदार्यांच्या निर्वाहाचा कालखंड.
- तिसरी पंचवीस वर्षे- वानप्रस्थाश्रम-या कालखंडात आपल्या आयुष्याच्या पहिल्या पन्नास वर्षात आपली कर्तव्यपूर्ती करताना, पती-पत्नी, दोघांना एकमेकांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही म्हणून मग आयुष्याची या तिसर्या कालखंडात पती-पत्नी दोघांनी प्रपंचाची सर्व सूत्रे मुलांच्या हाती सोपवून स्वेच्छेनी वनात जाऊन, एकमेकांच्या सहवासात पुढील पंचवीस वर्षे काढावी व आयुष्याच्या पुढील व शेवटच्या पंचवीस वर्षाच्या कालखंडासाठी मानसिक आणि शारीरिक रित्या स्वतःस सज्ज करावे अशी कल्पना होती.
ह्या सनातन प्रापंचिक नियमातील तिसर्या आश्रमात आपल्याला ह्या आधुनिक वृद्धश्रम व्यवस्थेचे बीजारोपण दिसते. स्वेच्छेनी स्वतः कौटुंबिक व्यवस्थेतून बाहेर पडून उर्वरित जीवन आपण आपल्यासाठीच जगायचे. स्वेच्छेनी स्वीकारलेल्या मार्गाचा अवलंब करताना, मनाला क्लेश होत नाहीत, मनात कुठले विषाद राहत नाही, किंवा कुणाच्या बद्दल तक्रार सुद्धा राहत नाही.
मग जेष्ठ नागरीकानो काय विचार आहे? वृद्धाश्राम्व्यवस्था स्वेच्छेनी स्वीकारणार न? चालला तर मग-निघू या, या आधुनिक वानप्रस्थाश्रमाकडे.
शुभास्त पंथास्ने|
No comments:
Post a Comment